अंशुला राव डोपिंगमध्ये दोषी, नाडाअंतर्गत आल्यानंतर ‘फेल’ होणारी पहिली हिंदुस्थानी क्रिकेटपटू

271

मध्य प्रदेशची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू अंशुला राव ही डोपिंगमध्ये दोषी सापडली आहे. बीसीसीआयने नॅशनल ऍण्टी डोपिंग एजन्सी (नाडा) यांच्या अंतर्गत येण्याचा निर्णय घेतल्यानंतर डोपिंगमध्ये फेल होणारी ती पहिलीच क्रिकेटपटू ठरली आहे.

नाडाकडून आता अंशुला राव हिला दोन ते चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. अंशुला राव हिचे सॅम्पल 14 मार्च रोजी बडोदे येथे घेण्यात आले. कतार येथील दोहामधील लॅबमध्ये त्याची चाचणी करण्यात आली. गेल्या महिन्यात नाडाला याबाबत रिपोर्ट मिळाला. अंशुला रावच्या चाचणीतून तिने ‘19 नोरान्ड्रॉस्टेरॉन’ हे सेवन केल्याचे समोर आले आहे. हे स्टेरॉईड असून एनाबोलिक एंड्रोजेनिक हार्मोनला प्रभावित करते. त्यामुळे ती दोषी सापडली आहे. आता अंशुला राव ‘बी’ सॅम्पलची चाचणी करावी याबाबत अपील करू शकते.

अंशुला राव ही मध्य प्रदेश संघाची खेळाडू असल्यामुळे बीसीसीआयच्या रजिस्टर यादीत तिचा समावेश आहे. तसेच 2019-20 सालामध्ये बीसीसीआयकडून आयोजित करण्यात आलेल्या 23 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता. याआधी हिंदुस्थानच्या पाच क्रिकेटपटूंना नाडाकडून नोटीस बजावण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या