कोण बनणार चॅम्पियन? यूएईत आयपीएलचा धमाका शनिवारपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला यूएईमध्ये शनिवारपासून सुरुवात होणार आहे. कोरोना या जागतिक संकटामधून सर्वच स्तरावर बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा परिस्थितीत आयपीएल ही जगातील उदंड प्रतिसाद लाभलेली स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे जगातील क्रीडाप्रेमींना थोडा तरी दिलासा मिळेल. याच पाश्र्वभूमीवर आगामी मोसमात कोणता संघ चॅम्पियन ठरील, कोणते फलंदाज धावांचा पाऊस पाडतील, कोणते गोलंदाज ठसा उमटवतील, कोणते युवा खेळाडू चमक दाखवतील यावर दैनिक ‘सामना’ने टाकलेला हा दृष्टिक्षेप.

स्मिथ, कमिन्स, मॅक्सवेल, आर्चरवर नजरा

यंदाच्या आयपीएलमध्ये परदेशी क्रिकेटपटूंमध्ये स्टीवन स्मिथ (राजस्थान रॉयल्स), पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स), ग्लेन मॅक्सवेल किंग्स इलेव्हन पंजाब), जोफ्रा आर्चर (राजस्थान रॉयल्स), खिस गेल (किंग्ज इलेव्हन पंजाब), जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) या क्रिकेटपटूंच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा खिळल्या असतील. बेन स्टोक्स या स्पर्धेत कोणत्या टप्प्यामध्ये खेळू शकेल याबाबत अद्याप काहीच सांगता येत नाही. गोलंदाजी विभागात अमित मिश्रा, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वरकुमार हे हिंदुस्थानी गोलंदाज धमक दाखवू शकतात.

पंच, रेफ्री यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारे पंच, रेफ्री यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. यंदाच्या आयपीएलसाठी 12 हिंदुस्थानी पंच, तीन परदेशी पंच व पाच हिंदुस्थानी सामनाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या सर्वांना यूएईमध्ये सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आले होते. हॉटेल रूममध्ये हिंदी सिनेमा पाहून त्यांनी क्वारंटाइनमधील दिवस घालवले. आता ते मैदानातील कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत.

यशस्वी, रवी या युवा खेळाडूंना संधी

यंदाच्या मोसमात हिंदुस्थानातील युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी भक्कम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यशस्वी जैसवाल, रवी बिश्नोई, देवदत्त पडीकल, इशान पोरेल, विराट सिंग या हिंदुस्थानच्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत ड्रेिंसग रूम शेअर करता येणार आहे. त्यामुळे या युवा ब्रिगेडला आपल्या खेळातही सुधारणा करता येणार आहे.

फिक्सिंग व भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाऊल

बीसीसीआयने आयपीएलमध्ये फिक्सिंग व भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. स्पोर्टरडार या वंâपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ही वंâपनी भ्रष्ट पद्धतीचा शोध लावणाऱ्या यंत्रणेद्वारा (एफडीएस) आयपीएलच्या लढतींच्या कालावधीत सेवा पुरवणार आहे. याआधी स्पोर्टरडारने फिफा व यूएफासाठीही काम केले आहे. आता बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकासोबत ही वंâपनी आयपीएलमध्ये कार्यरत राहणार आहे.

दिल्लीला हवंय जेतेपद

आयपीएल स्पर्धा सर्वाधिक चार वेळा जिंकण्याची करामत मुंबई इंडियन्सने केलीय. चेन्नई सुपरिंकग्जने तीन वेळा, कोलकाता नाइट रायडर्सने दोन वेळा या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवलीय. राजस्थान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्रत्येकी एक वेळा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केलाय. किंग्ज इलेव्हन पंजाबला एक वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला तीन वेळा जेतेपदाने हुलकावणी दिलीय. पण दिल्ली कॅपिटल्स संघ एकदाही फायनलमध्ये पोहोचलेला नाही. यंदा श्रेयस अय्यर अॅण्ड कंपनी जेतेपद पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावील यात शंका नाही.

विराट, रोहित, राहुल चमकणार

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स), के. एल. राहुल (िंकग्ज इलेव्हन पंजाब) या हिंदुस्थानच्या तीन फलंदाजांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. तसेच ए. बी. डिव्हिलीयर्स (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद), अॅरोन फिंच (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) हे परदेशी संघांतील फलंदाजही धावांचा रतीब घालू शकतात.

या स्पर्धेमुळे लाखो लोकांमध्ये सकारात्मकता येईल – सुनील गावसकर

कोरोनामुळे जगच ठप्प झाले. गेल्या काही दिवसांपासून सर्वच देश पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अद्याप कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. अशा वातावरणात आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात येत आहे. ही स्पर्धा जगभरातील जनतेमध्ये वेगळी ऊर्जा आणेल. क्रीडाप्रेमींमध्ये सकारात्मकता घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला आहे हिंदुस्थानचे माजी महान फलंदाज व समालोचक सुनील गावसकर यांनी.