क्रीडा : रिव्हर्स स्विंगला विसरा

588

इंग्लंड व वेस्ट इंडीज यांच्यामध्ये साऊथम्पटन येथे पहिली कसोटी खेळवण्यात आली. या कसोटीत पाहुणा वेस्ट इंडीज संघ विजयी झाला, पण या कसोटीत कोरोनामुळे गोलंदाजांना चेंडूला लाळ लावण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. याचा फटका गोलंदाजांना बसला. जेम्स अँण्डरसन चेंडूला स्विंग करण्यात माहीर आहे, पण या कसोटीत तो शॉर्टपिच गोलंदाजी करताना दिसत होता. याच पाश्र्वभूमीवर हिंदुस्थानचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने मत व्यक्त करताना म्हटले की, गोलंदाजांसाठी पुढचा काही काळ कठीण असणार आहे. हे असेच सुरू राहिले तर गोलंदाजांना चेंडू रिव्हर्स स्विंगग करताच येणार नाही.

बटलरची कारकीर्द धोक्यात

जोस बटलरकडे अफाट गुणवत्ता आहे, पण गेल्या १२ कसोटी डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्धचे पुढील दोन कसोटी सामने त्याच्या कारकीर्दीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे इंग्लंडचा माजी गोलंदाज डॅरेन गॉफ याने. तसेच पुढील दोन्ही कसोटींमध्ये इंग्लंडच्या संघाने संघनिवडीवर लक्ष द्यायला हवे, असे डॅरेन गॉफला वाटते. दरम्यान, पुढील दोन कसोटींसाठी जो रूटचे इंग्लंडच्या संघात पुनरागमन होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या