
क्रिकेटर पृथ्वी शॉ याचे हात लवकरच पिवळे होणार आहेत. पृथ्वी शॉने गर्लफ्रेंडसोबत सारखपुडा उरकून घेतला आहे. तो बऱ्याच काळापासून आकृती अग्रवालला डेट करत होता. आता या दोघांनी साखरपुडा करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला. पृथ्वीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर आकृतीसोबतचा साखरपुड्याचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.




























































