
मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी परिसर दुहेरी हत्याकांडाने हादरला आहे. राहुल हरी म्हस्के (वय – 33) याने पत्नी रूपाली राहुल म्हस्के (वय – 28) आणि चार वर्षांचा मुलगा रेहांश राहुल म्हस्के यांच्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री दोन ते तीनच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात रेहांश हा मुलगा जागीच मृत्युमुखी पडला, तर गंभीर जखमी झालेल्या रूपाली यांना शेजाऱ्यांनी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत असताना जालना जवळ त्यांचा मृत्यू झाला असल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे, अवचार सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मेहकर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






















































