वॉर्डनला धक्काबुक्की करणाऱ्या दोघांवर गुन्हा

 खासगी वाहनांना जाण्यास बंदी असल्यामुळे दुचाकीस्वाराला अडविल्यामुळे वॉर्डनला दोघांनी धक्काबुक्की केल्याची घटना पुणे- सातारा बीआरटी मार्गात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 यशवंत गोविंद जाधव (35, रा. पीएमसी कॉलनी, बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात खासगी वाहने जाऊ नयेत म्हणून यशवंत यांची केके मार्केट येथे नेमणूक होती. शुक्रवारी सायंकाळी ते वाहनांना बीआरटी मार्गातून जाऊ नये म्हणून इशारा करत होते. तरीही त्यांच्या इशाऱ्याकडे दुचाकीवरील दोघांनी दुर्लक्ष केले. तसेच, पुढे जाऊन परत येऊन त्यांनी जाधव यांना शिवीगाळ करून मारहाण करत कठड्यावर ढकलून दिले. याप्रकरणी सहकारनगर पोलिस तपास करत आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या