इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून 25 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या

2201

क्राईम पेट्रोल या मालिकेत काम करणार्‍या प्रेक्षा मेहता या 25 वर्षीय अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून प्रेक्षाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

प्रेक्षाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहली आहे. लॉकडाऊन जारी केल्याने प्रेक्षाकडे कुठलेच काम नव्हते. त्यामुळे ती नैराश्यात होती. स्वप्नांचा मृत्यू ही सगळ्यात जास्त वाईट गोष्ट असते अशी प्रेक्षाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. प्रेक्षाने क्राईम पेट्रोलसह प्रीता, मेरी दुर्गा आणि लाल इश्क या मालिकांमध्ये काम केले आहे.

ig-post

फक्त टीव्हीवरच नव्हे तर प्रेक्षाने नाटकांतही काम केले आहे. मंटो लिखित ‘खोल दो’ या नाटकातही काम केले होते. त्यानंतर खूबसूरत बहू, बुंदे, प्रतिबिंबित, थ्रील, औरत या नाटकाम काम केले. राष्ट्रीय नाट्य महोत्सवात तिला पुरस्कारही मिळाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या