गुन्हे वृत्त- तंबाखू दिला नाही म्हणून दोघांवर प्राणघातक हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तंबाखू दिला नाही म्हणून तरुणांची सटकली आणि रागाच्या भरात त्याने दोघांवर दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गोवंडी येथे घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून देवनार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अमित चंदनशिवे आणि गौस मोहम्मद खान हे दोघे मित्र गोवंडीच्या दिंडोशी बाग येथे गप्पा मारत उभे असताना आरोपी त्यांच्याजवळ गेला व त्याने गौसकडे तंबाखूची मागणी केली. मात्र गौस याने तंबाखू देण्यास नकार देताच आरोपीची सटकली. त्याने दोघांना शिवीगाळ करत रस्त्यावरचा दगड उचलून गौसच्या डोक्यात तर अमितच्या गालावर व गुडघ्यावर मारला. यात दोघांनाही दुखापत झाली.

अकाऊंट अपडेटच्या नावाखाली फसवणूक
अकाऊंट अपडेटच्या नावाखाली मेरीटाईम इंजिनीअरची १२ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. तक्रारदार हे कांदिवली येथे राहतात. ते एका जहाजावर काम करतात. चार महिने जहाजावर काम केल्यावर ते दोन महिने सुट्टीवर असतात. त्याचा पगार शीप मनी या ई-वॉलेटवर जमा होत असतो. त्याच्या ई-वॉलेटला त्याच्या ई-मेलची लिंक आहे. जुलैमध्ये जहाजावर सेकंड इंजिनीअर म्हणून रुजू झाले. त्यानंतर मार्च ते मे महिन्याची त्याची सॅलरी ई-वॉलेटमध्ये जमा झाली होती.