थोडक्यात – शस्त्र विकायला आलेल्या गुन्हेगारास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime

दोन पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे विकण्यासाठी उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या मनीष सहानी या गुन्हेगारास युनिट-7च्या पथकाने अटक केली. मनीष साकीनाका येथील अशोका इन या हॉटेलात थांबला होता. तो दोन स्वयंचलित पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे विकण्यासाठी आला असल्याची माहिती मिळताच युनिट-7 च्या पथकाने हॉटेलवर धडक देत मनीषला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ शस्त्रात्रे मिळून आली. मनीषविरोधात यूपीमध्ये दोन हत्येचे आणि एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

मालाडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या

मालाड (पूर्व) येथील तानाजी नगरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. सुचिता साळुंखे असे मृत महिलेचे नाव आहे. हत्येनंतर महिलेचा पती पळून गेला असून पुरार पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पती आकाश हा काहीच कामधंदा करत नसल्याने सुचिता या एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करून उदरनिर्वाह करत होत्या. दारूच्या आहारी गेलेल्या आकाश आणि सुचितामध्ये झालेल्या वादात आकाशने सुचितावर चापूने हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सुचिताला मृत घोषित केले.

वसईत विजेच्या झटक्याने चिमुकलीचा मृत्यू

घराच्या छतावरील पत्र्यातून जोरदार विजेचा झटका लागल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपारा पूर्वेकडील तुळिंज परिसरात घडली आहे. राजनंदिनी झा असे मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.