लालबागमध्ये आढळली चार फूटी मगर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वडोदरा

लालबागमध्ये तब्बल चार फूटी मगर आढळली आहे. पण हे लालबाग मुंबईतील नसून गुजरातमधल्या वडोदरात आहे. वडोदारतील लालबागमधल्या रेल्वे स्टाफ कॉलेजजवळ एका ड्रेनेज पाईपमध्ये ही चार फूट मगर आढळली आहे. या मगरीला पकडून पिंजर्‍यात ठेवण्यात आले आहे. वनविभागाला ही मगर सुपुर्द करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

याच भागात मगर सापडण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी पहिल्यांदा १ ऑक्टोबर २०१७ रोजी सहा फूट मगर आढळली होती. प्राणी मित्र संघटना आणि वन विभागाने या मगरीला सुरक्षितपणे पकडून तलावात सोडले होते. दुसर्‍यांदा १६ डिसेंबर २०१७ रोजी सात फूट मगर आढळली होती. तेव्हा पुन्हा या मगरीला सुरक्षितस्थळी सोडण्यात आले होते. जवळच असलेल्या विश्वमित्री नदीतून या मगर आल्याच अंदाज वनविभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली होता. भक्ष्याच्या शोधार्थ त्या या ड्रेनेजमध्ये आल्या असाव्यात असे अधिकार्‍यांनी गेल्यावर्षी सांगितले होते.