पीक कर्जासाठी भाजपचे आजपासून आंदोलन

589
bjp

कोरोनाच्या संकटात भाजपकडून राजकारण सुरूच आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या पीककर्जासाठी राज्य सरकारकडून बँकांना सूचना दिली गेली असतानाच भाजपकडून मात्र यासाठी आंदोलन पुकारण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे आणि कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागणीसाठी भाजप आजपासून आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिली.

कोरोनाचे संकट आहे म्हणून पाऊस, खरीप हंगाम आणि शेतीची कामे थांबत नाहीत. पीककर्जाचे वाटप ठप्प झाले आहे. त्यामुळे भाजपने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने प्रसंगी स्वत: कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीककर्ज द्यावे व कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी, अशी भाजपची मागणी आहे. पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी बँकांसमोर निदर्शने करतील. तसेच शेतकऱ्यांच्या सह्या गोळा करून त्यांचे निवेदन राज्य सरकारला सादर करतील. या आंदोलनात कोरोनाच्या साथीमुळे योग्य काळजी घेतली जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या