सीआरपीएफ तळाच्या टेहळणीसाठी प्रथमच ड्रोनचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील माओवादी आणि नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफ तळाच्या टेहळणीसाठी ड्रोनचा वापर होत असल्याचे प्रथमतः समोर आले आहे. त्यामुळे छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर प्रदेशातील सुमका जिल्ह्यात शूट ऍट साइटचे आदेश जारी केले आहेत.

ड्रोन्स अथवा मानवविरहीत वाहनांचा वापर (यूएव्ही) सुकमा जिह्यातील सीआरपीएफच्या तळाच्या टेहळणीसाठी नक्षलवाद्यांकडून केला जात आहे. सर्व दलांना याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. किस्ताराम आणि पल्लोडी येथील सीआरपीफ तळाच्या परिसरात आकाराने छोटे, लाल रंगाचा प्रकाश बाहेर फेकणारे ड्रोन्स गेल्या महिन्यात तीन दिवसांत किमान चार वेळा दिसून आले. या ड्रोन्सच्या घुमणाऱया आवाजाने तळावरील सुरक्षा जवान सावध झाले. त्यांनी नजीकच्या सर्व तळेंवर अलर्ट दिला, मात्र या ड्रोन्सना टिपण्यापूर्वी ते आकाशातून गायब झाले. मुंबईतील एका व्यापाऱयाने अज्ञात नक्षल्यांना ड्रोन्स विकल्याची खबर गुप्तचरांकडून कळाल्याने सर्वत्र अलर्ट देण्यात आला आहे.