कर्ली टेल्स मीडियाने वादग्रस्त व्हिडीओ घेतला मागे! शिव विधी व न्याय सेनेचा दणका

vivek-agnihotri

शिवसेनाप्रणित शिव विधी व न्याय सेनेच्या दणक्यानंतर कर्ली टेल्स मीडियाने मराठी खाद्य संस्कृतीचा अवमान करणारा वादग्रस्त व्हिडीओ मागे घेतला आहे. यूट्युबवर 17 ऑगस्ट रोजी हा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर शिव विधी व न्याय सेनेने संबंधित चॅनेलला नोटीस बजावली होती.

यूट्युबवर प्रसारित झालेल्या व्हिडीओतून दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री व अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृती व परंपराचा उपहासात्मक व अवमानकारक उल्लेख केल्याचा आरोप करीत शिव विधी व न्याय सेनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीश सोनवणे, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कर्ली टेल्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातल्या खाद्यसंस्कृती व पंरपरांचा उपहासात्मक उल्लेख केल्यामुळे मराठी खाद्य संस्कृतीचा अवमान झाल्याने लोकांच्या भावना दुखावल्याचे सांगत व्हिडीओतील वादग्रस्त भाग वगळण्यासाठी शिव विधी व न्याय सेनेने कायदेशीर नोटीस बजावली होती. यामुळे कर्ली टेल्स मीडियाने  संबंधित व्हिडीओतील वादग्रस्त भाग वगळला आहे.