अॅमेझॉनचा ग्राहकांना झटका, ऑर्डरवर मोजावे लागणार जास्त पैसे

ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे. अॅमेझॉनवरून ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कंपनीने ऑनलाईन सामान मागवण्यास मार्पेटप्लेस फी लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा चार्ज कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून केल्या जाणाऱ्या ऑर्डरवर लागू असणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना फटका बसणार आहे. तत्काळ सामान आणि फूड डिलिव्हरी करणारे प्लॅटफॉर्म ब्लिंकिट, स्विगी हे आधीपासून ऑर्डरवर प्लॅटफॉर्म चार्ज वसूल करतात. आता अॅमेझॉनसुद्धा त्यांच्या पंगतीत जाऊन बसले असून ते ग्राहकांकडून प्लॅटफॉर्म चार्ज वसूल करणार आहे. अॅमेझॉनवरील प्रत्येक ऑर्डरवर आता ग्राहकांना जास्तीचे 5 रुपये द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे चार्ज ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालवण्यास मदत करेल. ग्राहकांना हे चार्ज कोणत्याही प्रोडक्टच्या किमतीला सोडून द्यावे लागणार आहे. ग्राहकांना मिळणाऱ्या पावतीमध्ये हे चार्ज वेगळे दिसेल.

मार्पेटप्लेस चार्ज यावर लागणार नाही

अॅमेझॉन पेद्वारे बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज आदी डिजिटल सर्व्हिसवर मार्पेटप्लेस चार्ज लागणार नाही. तसेच ज्या ऑर्डरवर आधीच प्रोसेसिंग फी किंवा एक्सचेंज फी लावली असेल अशा कोणत्याही वस्तूंवर मार्पेटप्लेस चार्ज लावले जाणार नाही. तसेच अॅमेझॉनवरून पॅश ऑन डिलिव्हरीद्वारे जर एखादे सामान मागितले तर त्यावरही हे चार्ज लावले जाणार नाही. अॅमेझॉन स्टँडर्ड युजर्ससोबत प्राइम सदस्यांकडूनही 5 रुपये अतिरिक्त चार्ज वसूल केला जाईल. कोणतीही ऑर्डर रद्द करणे किंवा परत पाठवल्यास अतिरिक्त चार्ज परत दिले जाणार नाही.