
शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून जीआयएस प्रणालीशी लिंक करण्याचा ठेका सायबरटेक सिस्टीम्स ऍण्ड सॉफ्टवेअर लि. या कंपनीस दिला होता. मात्र, या कंपनीने काम अपूर्ण ठेवत बिले घेत सोलापूर महापालिकेला 3 कोटी 46 लाख 7 हजार 309 रुपयांचा चुना लावला आहे. याविरोधात ठेकेदार कंपनीतील पाच अधिकारी व पालिकेच्या एका नोडल अधिकाऱ्याविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन कांबळे, रामा सुब्रमण्यम, जयंत पंत, विशाल बरगट, दिलीप पांचाळ, रोहन जगताप अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
सोलापूर शहर हद्दीतील मिळकती जीआयएस प्रणालीशी लिंक करणे आणि करआकारणी कामकाजाचे संगणकीकरण करण्याचा ठेका सायबरटेक सिस्टीम्स ऍण्ड सॉफ्टकेअर लिमिटेड कंपनीस दिला होता. मात्र, या कंपनीने काम अपूर्ण ठेवून बिले उचलली आणि महापालिकेची आर्थिक फसवणूक केली. सर्क्हर बंद ठेवून शासकीय कामांचे नुकसान केले, असा ठपका महापालिकेने संबंधितांवर ठेवला आहे.
महापालिकेने सायबरटेक या कंपनीला 26 ऑगस्ट 2014 रोजी सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करून मिळकती जीआयएस प्रणालीशी लिंक करणे व करआकारणी कामकाजाचे संगणकीकरण करणे, इत्यादीचा ठेका 5 कोटी 20 लाख रुपयांना दिला होता.
ठरवून दिलेले काम पूर्ण झाल्याकर त्याचे बिल सादर करणे, हे काम पूर्ण झाले की नाही हे काम नोडल ऑफिसरने तपासणे आवश्यक होते. यानंतर थर्ड पार्टीकडून प्रत्येक बिलांचे ऑडिट करून घेऊन पालिका आयुक्तांच्या मान्यतेने कंपनीला बिल अदा करावे, अशी नियमावली होती. मात्र, कंपनीने फक्त एकदाच थर्ड पार्टीकडून बिलाचे ऑडिट करून घेतल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले. तसेच, या कंपनीने आजतागायत काम पूर्ण केले नाही.
तत्कालीन नोडल ऑफिसर कांबळे यांनी बिलांची तपासणी न करता काम पूर्ण झाल्याचे बिले सादर केले. तसेच कामाचे पूर्तता प्रमाणपत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परकानगीशिकाय सायबरटेक कंपनीस दिले. सायबरटेक कंपनीने काम अपूर्ण ठेवून वेळोवेळी अपूर्ण कामांच्या बिलाची मागणी करून संगणक प्रणालीचा सर्व्हर बंद ठेवून शासकीय कामात अडथळा आणला. याचा नागरिकांना नाहक त्रास झाला क मनपाचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.























































