
खाण्यापिण्याच्या चुकीच्या पध्दतींमुळे प्रौढांमध्ये तसेच बालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढलेले आहे तसेच शाळेच्या परिसरात सहजपणे उपलब्ध होणारे गोड आणि साखरयुक्त पेयांच्या सेवनांमुळे मुलांमध्ये टाईप टू मधुमेहाचा धोका वाढत असल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत दिली. शालेय विद्यार्थ्यांमधील वाढत्या मधुमेहाचे प्रमाण रोखण्याबाबत पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.