वाढवण-समृद्धी महामार्गासाठी 14 हजार कोटींचा खर्च अपेक्षित – दादा भूसे

पालघर जिह्यातील वाढवण बंदर हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

शिवसेना आमदार महेश सावंत यांनी वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱया फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भुसे म्हणाले की, हा प्रकल्प पालघर जिह्यातील डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरीला जोडला जाणार आहे. या प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळेल. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणारा फ्रेट कॉरिडॉर हा सहा पदरी असेल. रस्ता 100 मीटर तर बोगदा 80 मीटर रुंद असेल. या मार्गावर 100 किमी प्रति तास या वेगाने वाहने धावू शकतील.