दादर स्थानकात ‘तेजा मैं हूँ’चा सीन!

1584

तुम्ही ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटात परेश रावल यांच्या तोंडी ‘असली तेजा मैं हूँ यह देखो गालपर निशान!’ हा डायलॉग ऐकला असेलच, असाच काहीसा प्रकार मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात घडला आहे. मुख्य तिकीट निरीक्षक डय़ुटी बजावत असताना भलताच एक टीसी त्यांच्या स्थानकात आढळला आणि त्यांनी त्याला आयकार्ड विचारताच त्याचे पितळ उघड होऊन तो बोगस टीसी निघाल्याची घटना दादर रेल्वे स्थानकात घडली.

मुख्य तिकीट निरीक्षक एन. बी. सकपाळ यांच्या टीमसह डय़ुटीवर असताना बुधवारी सकाळी त्यांच्या हद्दीत एक अनोळखी चेहरा प्रवाशांना तिकीट विचारताना आढळला. सकपाळ यांनी या इसमाला पाहून त्याचे ‘आयकार्ड’ मागितले. तेव्हा असा कोणी टीसी रेकॉर्डवर नसल्याचे कळले. या बोगस टीसीचे नाव गौतम विश्वास सहस्त्रबुद्धे असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सकपाळ यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाबद्दल मध्य रेल्वेने त्यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या