
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून उस्ताद अल्लारखा इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिकतर्फे ‘प्रणाम – गुरुपौर्णिमा सोहळा’ या दिवसभर चालणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, गुरुवारी दुपारी २ ते रात्री ११ या वेळेत वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे हा कार्यक्रम होणार असून जयतीर्थ मेवुंडी, लुईस बँक्स, योगेश सम्सी, देवकी पंडित, राजीव सेठी, फझल कुरेशी, तौफिक कुरेशी अशा दिग्गज कलाकारांचा यात सहभाग असणार आहे. दिवसभराचा हा कार्यक्रम तीन स्वतंत्र सत्रांमध्ये विभागला असून, त्यात एकल गायनाची मैफल, भारतीय शास्त्रीय संगीतातील बदलत्या स्वरूपाचा वेध घेणारी चर्चा आणि विविध पिढ्या व शैलींतील कलाकारांना एकत्र आणणारी तालवाद्यांची बहारदार मैफल यांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.






























































