
सामना ऑनलाईन । मुंबई
‘हिमालय’ पूल दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या प्रशासकीय यंत्रणांनी पुलांच्या दुरुस्तीकर भर दिला आहे. पालिकेने मुंबईतील सर्व 262 पुलांचे नव्याने ऑडिट करण्याचा निर्णय घेतला असताना पश्चिम रेल्केनेही दादर फलाट क्र. 1, 2 आणि 3 करील पादचारी पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दुरुस्ती कामासाठी हा पादचारी पूल रविवारपासून 13 दिवस बंद ठेकला जाणार आहे. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील घसरत्या जिन्याची दुरुस्ती 17 मार्चपासून 16 जून या कालावधीत करण्यात येणार असल्याने 90 दिवस जिना बंद असणार आहे.




























































