दादर स्थानकाचा पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद

मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील मध्यभागी असलेल्या 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाशेजारील जुन्या पादचारी पुलाचा फलाट क्र.1 व 2 जवळील एक भाग 23 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात मध्यभागी असलेल्या 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाला समांतर असलेल्या जुन्या पादचारी पुलाचा काही भाग जरी दुरुस्तीकरिता बंद ठेवणार असले तरी त्याच्या बाजूच्या 12 मीटरच्या पादचारी पुलाला तो पायऱ्यांनी जोडलेला असल्याने प्रवाशांना बंद भागाची फारशी अडचण येणार नाही असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. हे काम पायऱ्या, लिफ्ट किंवा सरकता जिना बंद न करता करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या