पुन्हा एकदा डॅडीचा दरारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ’ या चित्रपटाला घवघवीत यश मिळालं. गँगवाॅर हा जरी चित्रपटाचा केंद्रबिंदू असला तरी हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही त्यात होती. मुंबईतील दगडी चाळ सर्वश्रुतच आहे. तिथला रुतबा अनेकांना हादरवतो. त्यामुळे हाच दरारा कायम ठेवत संगीता अहिर मुक्हीजचा ‘दगडी चाळ 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात काय नवीन पाहायला मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेच. शिवाय या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ज्या व्यक्तीवर आधारित आहे, त्या ‘डॅडीं’ची कन्या योगिता गवळी खुद्द या सिनेमाच्या सहनिर्मितीची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे आता ‘दगडी चाळ 2’ प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरेल, यात शंकाच नाही. अर्थात या चित्रपटात कोणाची वर्णी लागली आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘दगडी चाळ 2’चं दिग्दर्शनही चंद्रकांत कणसे करणार असून नवीन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.