उरणमध्ये गोविंदाची धूम

229

उरणमध्ये दहीकाला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरणमध्ये सार्वजनिक मंडळांच्या ११ दहीहंडी या होत्या. दहीहंडी फोडण्यासाठी विविध मंडळांच्या गोविंदा पथकांमध्ये स्पर्धाही पाहायला मिळाली. उरणमध्ये कुठेही अनुचित प्रकार न घडता उत्सव शांततेत पार पडल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली.

उरण नगरपरिषद व महेश बालदी मित्र मंडळ  यांच्या वतीने  दही हंडी उत्सवाला मोठी गर्दी होती. महाराष्ट्र भूषण डॉ .श्री  नारायण विष्णू धर्माधिकारी उरण नगरपरिषद मराठी शाळेच्या पटांगणात आयोजित दहिहंडी फोडण्याचा मान  उरणचा महाराजा  श्री येशीदेव गोविंदा पथक -उरण  यांनी पटकविला.

उरण तालुक्यातील अनेक गोविंदा पथकांनी सात थरांपर्यत  सलामी दिली. त्यांना आर्थिक मदत म्हणून पथकास अकरा हजार रोख रक्कम  व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, रवी भोईर, नगरपालिका कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या