Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 11 डिसेंबरचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष :-(ARIES – Saturday, December 11, 2021)
अनपेक्षित घटना घडतील. त्या लाभदायक होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. लोकांशी बोलताना मधुर वाणीचा वापर करा. कामं पटापट होतील.
शुभरंग – पांढरा

वृषभ :-(TAURUS – Saturday, December 11, 2021)
बढती/बदली चे योग येतील. कामाच्या ठिकाणी वजन वाढेल. लोकं तुमच्या शब्दास मान देतील. मन भरेपर्यंत खरेदी कराल.
शुभरंग – पिवळा

मिथुन :-(GEMINI – Saturday, December 11, 2021)
आज आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. अनोळखी व्यक्तीकडून फायदा होईल. मन आनंदी राहील.
शुभरंग- लाल

कर्क :-(CANCER – Saturday, December 11, 2021)
मानसिक सौख्य मिळण्याकरिता काही वेळा मनं सर्वार्थ साधनम् हे लक्षात ठेवा. व्यसने टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
शुभरंग – क्रीम

सिंह :-(LEO – Saturday, December 11, 2021)
स्पर्धेत यश मिळेल. जोडीदार खुश राहील. शुभ बातमी कानी पडण्याची शक्यता आहे.
शुभरंग – आकाशी

कन्या :-(VIRGO – Saturday, December 11, 2021)
अत्यंत उत्तम दिवस आहे. मिळालेल्या संधीचे सोने कराल. आज केलेली गुंतवणूक भविष्यात कामास येईल.
शुभरंग – जांभळा

तुळ :-(LIBRA – Saturday, December 11, 2021)
नेहमीपेक्षा वेगळे निर्णय घ्यावे लागतील. स्वतःसाठी वेळ द्याल. मनात नसतानाही प्रवास करावा लागेल.
शुभरंग – हिरवा

वृश्चिक 🙁 SCORPIO – Saturday, December 11, 2021)
आज लाल रंगाचा पोषाख घाला. मन प्रसन्न राहिल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
शुभरंग – चंदेरी

धनु :-(SAGITTARIUS – Saturday, December 11, 2021)
कुटुंबासोबत आत्यंतिक सुखाचा दिवस घालवाल. महत्त्वाची कामे आज पूर्ण कराल. दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ न करणे हाही त्यागच आहे हे लक्षात ठेवा.
शुभरंग: काळा

मकर 🙁 CAPRICORN- Saturday, December 11, 2021)
खर्च वाढू शकतात. विचारपूर्वक कृती करा. कमीत कमी शब्दात मत व्यक्त करायला शिका. म्हणजे लोक कंटाळणार नाहीत.
शुभरंग – चॉकलेटी

कुंभ :-(AQUARIUS – Saturday, December 11, 2021)
त्याच त्याच कामाचा कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगळे काम करा. नवे छंद जोपासा. निसर्गात कृतज्ञ राहा.
शुभरंग – राखाडी

मीन :-(PISCES – Saturday, December 11, 2021)
मनावर ताबा ठेवा. आर्थिक नियोजन करा. खर्चास तयार रहा. दुसऱ्यांचा विचार करा.
शुभरंग – पोपटी