Daily Horoscope 20November 2021 – काय आहे आजचं राशिभविष्य?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवार 20 नोव्हेंबर 2021

मेष:- खर्चाचे नियोजन करा. तुम्ही करत असलेली उपासना लाभदायक ठरेल. लोकांना समजून घ्यावे लागेल.
शुभरंग: सोनेरी

वृषभ:- पैशाचे सोंग आणता येत नाही हे तुम्हाला माहितच आहे. मोठ्या कामात हात घालताना योग्य सल्ला घ्या. मेहनतीचे फळ मिळतेच.
शुभरंग: मोरपिशी

मिथुन:- वाहन जपून चालवा. आवडती वस्तू खरेदी कराल. ज्यांची आठवण येते ती व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे.
शुभरंग: केशरी

कर्क:- आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे. सौख्य लाभेल. आनंदी राहाल.
शुभरंगः हिरवा

सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल. मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या. आराम करा.
शुभरंग: पांढरा

कन्या:- कोणतेही काम करताना घाई करू नका. सबुरी बाळगा. स्वतः कडे लक्ष द्यायला आज वेळ मिळेल. दुसऱ्यांची मर्जी राखाल.
शुभरंग: लाल

तूळ:- आज विश्रांतीच घेतलेली बरी. आरोग्याची काळजी घ्या. वेळेला महत्त्व द्यावे लागेल.
शुभरंगः निळा

वृश्चिक:- आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी आहे असे समजा. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण ककरण्यासाठी वेळ द्याल. ईच्छा तेथे मार्ग.
शुभरंग: आकाशी

धनु:- मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील. घरातील ज्येष्ठांची सेवा कराल.
शुभरंग: काळा

मकर:- दिलेल्या शब्दाला जागा. आरोग्य सांभाळाल. वैयक्तिक कामांना वेळ द्या.
शुभरंग: चॉकलेटी

कुंभ:- जोडीदारासोबत सिनेमाला जावेसे वाटू शकते. प्रिय व्यक्ती भेटल्याचा आनंद होईल. ध्यानधारण करा.
शुभरंग: जांभळा

मीन:- प्रेमाने बोला. आवडीचा सिनेमा पाहण्याची किंवा आवडते संगीत ऐकण्याची संधी मिळू शकते. प्रिय व्यक्तीला वेळ द्या.
शुभरंग: पोपटी