
तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर भाष्य केले आहे. दलाई लामा यांनी पोप लिओ चौदावे यांनी केलेल्या शांततेच्या आवाहनाला पाठिंबा देत इराण, अमेरिका आणि इस्रायल, तसेच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. सर्वच धर्म सहिष्णुता आणि शांततेची शिकवण देतात आणि हिंसाचार हा निषेधार्ह आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दलाई लामा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोप लिओ यांनी पाम संडेच्या प्रार्थनेदरम्यान शांततेसाठी जे आवाहन केले असून त्याला मी मनापासून पाठिंबा देतो. शस्त्रे खाली ठेवण्याचा आणि हिंसाचाराचा त्याग करण्याचा त्यांचा संदेश माझ्या हृदयाला स्पर्श करून गेला. जगातील सर्व प्रमुख धर्मांचे हेच सार आहे, असे दलाई लामा म्हणाले.
ख्रिश्चन, बौद्ध, इस्लाम, हिंदू किंवा ज्यू असो, जगातील सर्व महान आध्यात्मिक परंपरांचे मूळ संदेश प्रेम, करुणा, सहिष्णुता आणि आत्मसंयम हेच आहेत. कोणत्याही धर्मात हिंसाचाराला स्थान नाही. इतिहास साक्षी आहे की, हिंसाचारातून केवळ हिंसाच जन्माला येते; तो शांततेचा कायमस्वरूपी पाया ठरू शकत नाही, असेही ते म्हणाले.
युद्धखोर नेत्यांची प्रार्थना देव स्वीकारणार नाही; पोप लिओ यांची नाव न घेता ट्रम्प यांच्यावर टीका
कोणताही वाद संवाद आणि मुत्सद्देगिरीनेच सुटू शकतो. आपण सर्वजण एकाच मानवतेचे घटक आहोत, या भावनेतून एकमेकांचा आदर करणे गरजेचे आहे. मी प्रार्थना करतो की हे युद्ध आणि संघर्ष लवकरच संपोत, असे आवाहन दलाई लामा यांनी केले.
MESSAGE
I wholeheartedly endorse the powerful appeal for peace made by the Holy Father, Pope Leo, during his Palm Sunday Mass. His call for the laying down of arms and the renunciation of violence resonated profoundly with me, as it speaks to the very essence of what all major… pic.twitter.com/Md0riCApbM
— Dalai Lama (@DalaiLama) March 31, 2026
























































