दापोलीत 9 लाख रुपयांचा गुटखा जप्त

506

देशभरात गुटखा बंदी असली तरी रत्नागिरी जिल्ह्यात छुप्या पध्दतीने गुटखा विक्री सुरु असल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री दापोली तालुक्यात एका गोदामावर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने 9 लाख 77 हजार 457 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. दापोली-मंडणगड रस्त्यावर एका बंद गोदामात गुटखा साठवण करुन ठेवला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. याप्रकरणावरून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची उलाढाल होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

दापोली तालुक्यात गुटख्याचा साठा असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनावर मिळताच त्यांचे पथक रत्नागिरीतून दापोलीला रवाना झाले. रात्री दापोलीतील गणेश गोविंद खेडेकर यांच्या गोदामात 9 लाख 77 हजार 457 रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला सापडला. रात्री उशीरापर्यंत सर्व गुटखा जप्त करून गोदाम सील करण्यात आले आहे. गुटखा साठवण केल्याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त एस.आय.हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी पी.पी.गुंजाल व डी.एम. बांबले (एफ.एस.ओ.) यांनी केली ही कारवाई करत गुटखा जप्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या