सोन्याची साखळी चोरणारा पोलिसांच्या ताब्यात

दापोली तालुक्यातील पालगड येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि कानातील झुमके चोरून नेणाऱ्या चोरट्याला दापोली पोलिसांनी पकडले.

रस्त्यावर जीओ इंटरनेट पोलला अर्थिंग देत असल्याचे सांगून सविता जोंधळे यांचे 49 हजार रूपये किमंतीचे दागिने चोरून फरार झालेल्या आरोपीचा पोलिस शोध घेत होते. हा अल्पवयीन आरोपी पान टपरीवर आढळून आला. सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्या खिशात चोरलेले दागिने सापडले.

आपली प्रतिक्रिया द्या