मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात रविवारी दुपारी एक भयंकर अपघात घडला. एका भरधाव दुचाकीस्वाराने ह्युंदाई क्रेटा कारला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार थेट एका बॅरिकेडला जाऊन धडकला तर कार थेट फुटपाथवर आदळली. या घटनेचा थरारक व्हिडीओ सिग्नलला थांबलेल्या कारच्या डॅशकॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कारच्या मागील व्ह्यू कॅमेऱ्यात वेगात जाणारी दुचाकी दिसत आहे. तर कारच्या पुढील कॅमेऱ्यात दुचाकीस्वार सिग्नल तोडून पुढे जाताना दिसला. त्यामुळे उजव्या बाजूने येणाऱ्या ह्युंदाई क्रेटा कारला दुचाकीस्वाराची मागून धडक बसली.
Today witnessed a horrible accident at Marin Driving. Dialled 100 updated the call center & received a call back from some cop asking for exact location and asking if ambulance was needed. Couple was saved due to barricades @MTPHereToHelp @MumbaiPolice white car is 100% innocent pic.twitter.com/acaMlr0Imj
— Suyog Vyawahare (@suyogvyawahare) September 29, 2024
हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या अपघातातील व्यक्तींच्या स्थितीबद्दल अद्याप कोणतेही माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.