दत्ता मेघे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री, माजी खासदार दत्ता मेघे यांचे आज रात्री पावणेनऊच्या सुमारास हृदयविकारामुळे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.

दत्ता मेघे यांनी खासदार म्हणून नागपूर, रामटेक आणि वर्धा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी तीन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणूनही कारकीर्द गाजवली. राज्यसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषविले होते. दत्ता मेघे यांच्या निधनाचे वृत्त कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कॉंग्रेस नेते नाना पटोले, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांनी मेघे यांच्या पांडे ले-आऊट येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. दत्ता मेघे यांचे पार्थिव उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.