गणपती साणा येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

sunk_drawn

देवगड शहरातील गणपती साणा येथे गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉक तसेच कपडे धुवायला गेलेल्या महिलांना युवकाचा मृतदेह नदीत तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्याची माहिती पोलीस ठाण्याला देण्यात आली.

शहरातील गणपती साणा येथे जानवली नदीत एक जण बुडाल्याची शक्यता बुधवारी वर्तवण्यात येत होती. त्यावेळी नदीकिनारी कुंदन प्रसाद (उत्तरप्रदेश) या व्यक्तीचे आधार कार्ड मोबाइल कपडे व चप्पल आढळून आले होते. तर बुधवारी दुपारी नदीपात्रात एक व्यक्ती बराच वेळ आंघोळ करत असल्याचेही काहींनी पाहिले होते.

घटनेची माहिती मिळतात पोलीस बुधवारी रात्री गणपती साणा येथे दाखल झाले. स्थानिकांच्या तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली असता रात्री अंधार असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती. तर कुंदन प्रसाद हा जानवली – आदर्श नगर एका व्यवसायिकाजवळ कामाला होता असल्याचीही माहिती मिळाली आहे.

याबाबत काल रात्री पोलिसात नोंद करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी पुन्हा शोधमोहिम सुरू करण्याआधीच त्या युवकाचा मृतदेह सापडल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. नदीतील कमी पाण्यात तो युवक नेमका कसा बुडाला, त्याची तब्बेत ठणठणीत होती काय, आदी सवाल उपस्थित होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या