
गेवराईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पालख्या डोंगरावरील थरारक दृश्य पाहून अनेकांची गाळण उडाली. या डोगरावर एक विद्रुप केलेल्या स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे मुंडके झाडाला टांगलेले होते तर धड लटकलेल्या स्थितीत होते. ते पाहून अनेकांची भीतीने गाळण उडाली.
गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावर शनिवारी पोलीस प्रशासनाला एक बेवारस दुचाकी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली तेव्हा तेथील विचित्र दृश्य बघून त्यांनाही धक्का बसला. एका झाडाला मानवी मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता. मृतदेहाचे मुंडके झाडाला टांगलेले होते. तर शरीर झाडाला लटकलेल्या स्थितीत होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठवला आहे. मृतदेह कुजल्याने सांगाडाच दिसत होता. हा सांगाडा नेमका कुणाचा आहे. हा घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे.