साडवलीतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला

देवरुखजवळील साडवली भुवडवाडीतील प्रताप विठ्ठल पवार ( वय 48) हे 12 जानेवारीला घरातून न सांगता बाहेर पडले होते. घरच्यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नव्हते. बुधवारी मिलींद जाधव यांना पडक्या विहिरीत त्यांचा मृतदेह दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

जाधव यांनी देवरुख पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. पोलीस घटनास्थळी पोहचले. मात्र, विहिर खोल असल्याने मृतदेह काढणे शक्य झाले नाही. त्यामुळे गुरुवारी सकाळी क्रेनच्या साहाय्याने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलीसांना राजु काकडे हेल्प ॲकॅडमीच्या सदस्यांनी सहकार्य केले. हा मृतदेह प्रताप पवार यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी पंचनामा करुन आकस्मिक मृत्युची नोंद केली.संगमेश्वर येथे शवविच्छेदन करण्यात आले.अधिक तपास पोलीस नाइक संतोष सडकर करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या