आयटीआर फाईलसाठी 10 डिसेंबरपर्यंत डेडलाईन

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने आर्थिक वर्ष 2025-26 साठी कंपन्या आणि ऑडिटची आवश्यकता असलेल्या करदात्यांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) करण्याची डेडलाईन 10 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. याआधी ही तारीख 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत होती. याशिवाय करदात्यांना ऑडिट रिपोर्ट जमा करण्यासाठी 10 नोव्हेंबर ही डेडलाईन दिली आहे. आतापर्यंत 7.54 कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर दाखल केले आहे.