मध्य प्रदेशात लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये स्फोट

मध्य प्रदेशातील दतिया जिह्यात लष्कराच्या फायरिंग रेंजमध्ये दारूगोळय़ाचा भीषण स्पह्ट झाला. या दुर्घटनेत 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. बळींपैकी एकाने जमिनीवर पडलेला फुटलेला दारूगोळय़ाचा तुकडा उचलला होता. यादरम्यान त्याचा स्पह्ट झाला, असे अधिकाऱयांनी सांगितले. सकाळी 9 वाजता येथील जैतपूर गावाजवळ ही घटना घडली. फायरिंग रेजच्या परिसरात राहणारे लोक अनेकदा दारूगोळा एकत्र करतात आणि तो भंगार म्हणून विकतात, पण फुटलेल्या दारूगोळ्याचा अचानक स्फोट होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.