
स्वीट्जरर्लंडच्या प्रसिद्ध क्रॅन्स-मोंटाना येथे नववर्षाच्या जल्लोषादरम्यान एका नाइटक्लबमध्ये भीषण स्फोट झाला. या सफोटोनंतर लागलेल्या आगीत सुमारे ४० लोकांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १:३० वाजता घडली. येथे ‘ले कॉन्स्टेलेशन’ नावाच्या बारमध्ये २०० हून अधिक लोक नववर्ष साजरे करत होते. याचवेळी ही घटना घडली.
स्फोटानंतर तात्काळ पोलीस आणि आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बारमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पार्टी सुरू असताना हा स्फोट झाला. पहाटे १:३० च्या सुमारास लोक आनंदात मग्न असताना हा स्फोट झाला. बारमध्ये आग नेमकी कशी लागली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


























































