
भ्रष्टाचारप्रकरणी व्हिएतनाममधील बांधकाम व्यावसायिक टओंग माय लॅन यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्यावर सायगॉन कमर्शियल बँकेची 12.5 अब्ज डॉलरची रक्कम वैयक्तिक कारणासाठी उधळल्याचा आरोप आहे. व्हिएतनामच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. लॅन या प्रॉपर्टी डेव्हलपर पंपनी ‘व्हॅन थिन्ह
फॅट’च्या अध्यक्षा आहेत. याप्रकरणी लॅन यांच्याव्यतिरिक्त 85 जणांविरुद्ध देखील निकाल देण्यात आला आहे.





























































