सिक्कीममधील मृतांची संख्या 56 वर, अजूनही 142 बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या 56 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 26 मृतदेह सापडले असून 30 मृतदेह पश्चिम बंगालच्या तीस्ता नदीत आढळले आहेत. सिक्कीममधील लष्कराच्या जवानांसह कमीत कमी 142 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मंगन जिह्यात चार, गंगटोकमध्ये सहा आणि पाक्योंग जिह्यात सात मृतदेह आढळले आहेत.

पश्चिम बंगाल सरकारच्या माहितीनुसार, तीस्ता नदीच्या पात्रात तीन जिल्हे सिलिगुडी, जलपाईगुडी आणि कूच बिहारमध्ये 30 मृतदेह सापडले आहेत. बुधवारी झालेल्या ढगफुटीमुळे अचानक आलेल्या पुरामुळे सिक्कीममध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. 25 हजारांहून जास्त गावांना याचा फटका बसला आहे. तर 1200 हून जास्त घरांना नुकसान पोहोचले आहे. 13 पूल, रस्ते पाण्यात अक्षरशः वाहून गेले. विविध परिसरातील 2,413 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.