चीन सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अब्जावधी डॉलर्सचं प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले असले तरी देशावरील कर्जाचे ओझे काही कमी होताना दिसत नाही. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चीनचा डेट-टू-जीडीपी रेश्यो 366 टक्क्यांवर पोहोचलाय. 2008 च्या आर्थिक संकटानंतर हे प्रमाण दुप्पट झालं. नॉन फायनान्शिअल कॉर्पोरेटचा रेश्यो सर्वाधिक 171 टक्के आहे. त्यानंतर सरकारच्या कर्जाचं प्रमाण 86 टक्के आहे. जवळपास तीन दशकांपासून जगाची फॅक्ट्री बनलेला चीन आता अनेक आघाडय़ांवर संघर्ष करत आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावामुळे चीनची स्थिती आणखी बिकट झालीये. देशात बेरोजगारीची आकडेवारी शिगेला पोहोचली आहे, तर रिअल इस्टेट क्षेत्र गंभीर संकटात आहे आणि लोक पैसे खर्च करण्याऐवजी बचत करत आहेत. चीनच्या या अवस्थेचा परिणाम इतर देश आणि परदेशी कंपन्यांवरही दिसून येतोय. गेल्या काही महिन्यांत पहिल्यांदाच जपानची निर्यात घटली आहे.