मराठवाडय़ात तातडीने दुष्काळ जाहीर करा,काँग्रेसची सरकारकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडय़ात पावसाअभावी दुष्काळसदृश स्थिती असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने मराठवाडय़ात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आज काँग्रेसने सरकारकडे केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मराठवाडा विभागाची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. यावेळी छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशीव, बीड या जिह्यांचा आढावा घेण्यात आला. त्या बैठकीनंतर नाना पटोले व अन्य नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात केवळ 40 टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या वरच्या भागातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचे सरकारने पालन करावे, असे यावेळी पटोले म्हणाले.