तात्काळ दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेचे हल्लाबोल आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अंबड

अंबड तालुक्यात पावसाअभावी पिके करपून गेली असून तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यासह जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने सोमवार, दि. १ रोजी तहसीलदार किशोर देशमुख यांना देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शासकीय कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, माजी उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब पाऊलबुद्धे, तालुकाप्रमुख अशोक बरडे, राजेंद्र भोसले आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसलिदार, अंबड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला आहे. अत्यल्प पावसाने धरणे, नद्या पाण्याचे स्रोत कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून तालुक्यात गावे, तांडे, वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर सुरू करावेत. जनावरासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात व अंबड तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून दुष्काळी परिस्थितीच्या उपाययोजना कराव्यात.

वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनावेळी वीज अधिकाऱ्यांनी सक्तीची वीज वसुली थांबवावी. तसेच वीजकनेक्शन कट करू नये, अशा सूचना माजी आमदार संतोष सांबरे यांनी केल्या. तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन देऊन शेतकऱ्यांसाठीच्या योजना राबविताना योग्य ती काळजी घेऊन जनजागृती करावी व दुष्काळी परिस्थितीबाबत उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी तालुका संघटक दिनेश काकडे, शहरप्रमुख कुमार रूपवते, युवा सेनेचे सिद्धेश्वर उबाळे, शिवसेना दलित आघाडीचे अ‍ॅड. भास्कर मगरे, अनिस तांबोळी, सचिन घुगे, मुकुंद हुसे, प्रकाश म्हस्के, विठ्ठल वाघमारे, रमेश वराडे, प्रल्हाद मुर्तडकर, जितेंद्र जैन, शिवराम भोजने, तानाजी बनसोडे, सोपान चव्हाण, संदीप आरगडे, बबन डोईफोडे, बद्री मोहकर, संदीप सदावर्ते, संतोष अंबिलवादे, जुनेद इलियास, गणेश मुळे, गणेश पाऊलबुद्धे, मोहन मुळे, अशोक शेकळे, संतोष बरगे, नारायण टिळेकर, शिवाजी शेळके, रामेश्वर आढाव, विशाल काजळे, रामभाऊ वीर, रामेश्वर मुळे, सीताराम वीर, काकासाहेब शेळके यांच्यासह शेकडो शिवसैनिक व युवासैनिकांची उपस्थिती होती.