दीपिका-रणवीर झाले अलिबागकर, मापगाव येथे घेतली 90 गुंठे जागा

बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे आता अलिबागकर झाले आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे 90 गुंठे एनए जागा त्यांनी 22 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. या जागेत नारळ, सुपारीची बाग आणि दोन बंगले आहेत. अलिबाग येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या जागेची खरेदी रजिस्टर करण्यासाठी दीपिका आणि रणवीर आले होते.

अलिबाग हे पर्यटन स्थळ असल्याने आणि निसर्गाने नटलेले आहे. त्यामुळे उद्योगपती, क्रिकेटर, अभिनेते, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी अलिबागमध्ये आपले सेकंड होम घेतले आहे. रणवीरसिंग आणि दीपिका पदुकोण या जोडप्यालाही अलिबागच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.

त्यामुळे अलिबागच्या मापगाव येथे या जोडप्याने 90 गुंठे जागा खरेदी केली आहे. या जागेत दोन बंगले असून काही बागायत आहे. या जागा खरेदीमुळे रणवीर आणि दीपिका हे दोघेही आता अलिबागकर झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या