दीपिका पदुकोणची जेएनयुला भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

858

नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. या हल्ल्याविरोधात जेएनयूचे विद्यार्थी निदर्शने करत असताना अभिनेत्री दीपिका पदुकोणने विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या हल्ल्याचा निषेध करत तिने विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला.

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जेएनयूसारख्या विद्यापीठावर हल्ला होणे, ही खेदाची बाब असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या