
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी (१२ एप्रिल) दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंचे निधन झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “हिंदुस्थानातील सर्वात प्रसिद्ध आणि अष्टपैलू गायकांपैकी एक असलेल्या आशा भोसलेंच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. त्यांचा संगीत प्रवास अनेक दशकांचा होता, या दरम्यान त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध केली.”
भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण… pic.twitter.com/JsjoxbdCCt
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2026
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, त्यांच्या आवाजाने केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांच्या आवाजात एक अनोखी जादू होती जी नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्यासोबतच्या माझ्या भेटींच्या आठवणी हृदयात कोरलेल्या राहतील. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना माझ्या सहवेदना व्यक्त करतो. आशा भोसलेजी येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सर्वांच्याच हृदयात कायम गुंजत राहतील.”
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी प्रसिद्ध गायिका आशा भोसलेंना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, आशाताईंनी आपल्या मधुर आवाजाने आणि अतुलनीय प्रतिभेने स्वतःचे वेगळेपण तर सिद्ध केलेच, त्या बरोबरीने आपल्या सुमधुर गीतांनी भारतीय संगीताला समृद्ध केले. आपल्या आवाजाने लाखो लोकांची मने जिंकणाऱ्या आशाताईंनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि गुजराती यांसारख्या भाषांमधील लोकगीतांवर अमिट छाप सोडली आहे. त्यांच्या आठवणी कायम आपल्या हृद्यात कोरलेल्या राहतील.
आज हर भारतीय और विशेषकर मेरे जैसे हर संगीत प्रेमी के लिए दुःखद दिन है, जब हम सबकी प्रिय आशा भोसले जी हमारे बीच नहीं रहीं।
आशा ताई ने न सिर्फ अपनी मधुर आवाज और अद्वितीय प्रतिभा से एक अलग पहचान बनाई, बल्कि अपने सुरों से भारतीय संगीत को भी और अधिक समृद्ध किया। हर तरह के संगीत में… pic.twitter.com/ICbqgW6j38
— Amit Shah (@AmitShah) April 12, 2026
























































