जोगेश्वरी-सर्वोदय नगरमध्ये दीपोत्सव, किल्ले बांधणी स्पर्धा

जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर येथे सर्वोदय स्पोर्ट्स क्लबतर्फे ‘सर्वोदय दीपोत्सव 2025’ अंतर्गत ‘किल्ले बांधणी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत एमएचबी कॉलनीतील गणेश मैदान येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. याचवेळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि किल्ले बांधणी स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाणार आहे. सर्वोदय नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि श्री हनुमान साई सेवा मंडळाच्या सहकार्याने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.