काळेवाडीत ‘दीपोत्सव 2021’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग. द. आंबेकर मार्गावरील सच्चिदानंद हौसिंग सोसायटी येथील ओम दत्तात्रय क्रीडा मंडळाच्यावतीने 2 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत दीपोत्सव 2021चे आयोजन केले आहे. मंडळाचे यंदाचे 43 वे वर्षे आहे. यानिमित्त मंगळवारी श्री महालक्ष्मी देवीची स्थापना करण्यात आली आहे. दीपोत्सवादरम्यान सत्यनारायणाची महापूजा, गोंधळ, महिलांसाठी आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, हळदी कुंकू, सप्तसुर संगीत कार्यक्रम, बक्षीस समारंभ आणि विसर्जन सोहळा असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश तळेकर आणि सेक्रेटरी सुभाष साटम यांनी दिली.