खड्ड्यात पडलेल्या जखमी हरणाची अग्निशमन दलाने केली सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील डुक्कर खिंड परिसरात खोल खड्यात पडलेल्या एका हरणाची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. जवळपास दोन ते अडीच तास त्याच्या सुटकेचा प्रयत्न सुरू होता. मुंबई-पुणे रस्त्यावर डुक्कर खिंडी भागात पाईप लाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी खड्डे खोदले आहेत. त्या खड्यात हरिण अडकले होते. काही नागरिकांनी हरीण दिसून आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली.

त्यानंतर सिंहगड रोड अग्निशमन दलाच्या जवान व वन विभागाने हरणाच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. जवळपास एक तासांच्या प्रयत्नानंतर हरिणाला जाळीच्या साहाय्याने सुखरूप खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. पायाला जखम झाल्यामुळे हरणाला वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशामन दलाच्या जवान तांडेल शिवाजी मुजुमले, फायरमन शिवाजी आटोळे, संतोष नलावडे तसेच चालक सतीश देशमुख यांनी हरणाची सुखरूप सुटका केली. हरिणाची सुटका करण्यासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापक अभिजीत महाले, विश्वेश महाजन, अमित तापासे आणि डॉक्टर सुश्रुत शिरभाते यांनी सहकार्य केले आहे.