सिंध पुन्हा हिंदुस्थानात येऊ शकते! राजनाथ सिंह यांचे वक्तव्य

rajnath-singh

देसिंध प्रांत आज हिंदुस्थानचा भाग नसला तरी सांस्कृतिकदृष्टय़ा तो कायम हिंदुस्थानचाच भाग राहील. जमिनीच्या बाबतीत सांगायचे तर सीमा कधीही बदलू शकतात. सिंध पुन्हा हिंदुस्थानातही येऊ शकते, असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले.

एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘सिंध प्रांत हिंदुस्थानपासून वेगळा होणे हे तेथील हिंदूंनी, विशेषतः जुन्या पिढीतील लोकांनी अजूनही स्वीकारलेले नाही. केवळ सिंधमध्येच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू हे सिंधू नदीला पवित्र मानतात, असे राजनाथ सिंह म्हणाले.