ट्रेनला उशीर झाला तर अधिकाऱ्यांच्या प्रमोशनवर होणार परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या अनेक तक्रारी असतात. मात्र आता रेल्वेने घेतलेला निर्णय ऐकल्यावर प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. रेल्वे उशिराने धावल्या तर त्याचा फटका हा अधिकऱ्यांना बसणार आहे. कारण रेल्वेच्या नव्या निर्णयानुसार, रेल्वे उशिराने धावल्यास जबाबदार अधिकाऱ्यांचं प्रमोशन रोखण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या सर्व विभाग प्रमुखांना रेल्वेला उशिर झाला तर प्रमोशन रोखण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात रेल्वे मंत्री गोयल यांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी रेल्वेला सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे अधिकाऱ्यांना खडसावलं. तसेच पुढे जर अशाच प्रकारे उशिर झाला तर प्रमोशन रोखण्यात येईल असेही सांगितलं. रेल्वेच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी एका महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. २०१७-२०१८ मध्ये जवळपास ३० टक्के ट्रेन या उशिराने धावल्या होत्या. तसेच आता ही सुट्टीच्या महिन्यात य़ामध्ये सुधारणा झालेली नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना रेल्वेच्या उशिरा येण्याबाबत काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर आता गोयल यांनी रेल्वेच्या सर्व विभाग अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती त्याचवेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.