दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली; ऐन दिवाळीत GRAP-2 लागू

ऐन दिवाळीत दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढती प्रदूषण पातळी पाहता राज्यात GRAP 2 लागू करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक निर्बंध लादले आहेत. CAQM नुसार, रविवारी दिल्लीतील सरासरी प्रदूषण पातळी २९६ नोंदवली गेली. त्यानंतर झालेल्या बैठकीत दिल्ली-एनसीआरमध्ये GRAP 2 निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला.

GRAP-2 अंतर्गत, दिल्ली-एनसीआरमध्ये धूळ नियंत्रित करण्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवली जाणार. तसेच आणि गर्दीच्या ठिकाणी किंवा धुळीचे प्रमाण जास्त असलेल्या भागात धूळ नियंत्रित करण्यासाठी स्मॉग गन बसवल्या जाणार. डिझेलवर चालणारे घरगुती जनरेटर वापरण्यास मनाई असेल आणि वीजपुरवठा खंडित झाल्यासच कारखान्यांना त्यांचा वापर करण्याची परवानगी असेल.

याशिवाय रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे एक पथक तैनात केले जाईल. ज्यांची जबाबदारी वाहतूक कोंडी रोखण्याची असेल. सरकार पार्किंग शुल्क वाढवू शकते, जेणेकरून लोक त्यांच्या वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील.

दरम्यान, GRAP मध्ये एकूण चार टप्पे आहेत. पहिला टप्पा AQI २०१ ते ३०० दरम्यान असताना अंमलात आणला जातो. दुसरा टप्पा AQI ३०१ ते ४०० दरम्यान असताना अंमलात आणला जातो, तर तिसरा टप्पा AQI ४०१ ते ४५० दरम्यान असताना अंमलात आणला जातो. चौथा टप्पा AQI ४५० पेक्षा जास्त असताना अंमलात आणला जातो.